पुणे – सन 2020-21 च्या अंदाजपत्रकाची तयारी महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत 31 मार्च 2020 पर्यंत अपेक्षित उत्पन्न आणि खर्चाची माहिती मागविण्यात आली आहे. ती दि, 7 ऑक्टोबरपूर्वी सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तयारीसाठी सर्व विभागांना 30 सप्टेंबर 2019 पर्यंत मिळालेले प्रत्यक्ष उत्पन्न, 31 मार्च 2020 पर्यंत मिळणारे उत्पन्न, 31 मार्चपर्यंत होणारा संभाव्य खर्च, आतापर्यंतच्या निविदा अशी सर्व माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.