मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती उद्भवलेल्या मुंबईत आता प्रशासनाने आगामी संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने जोरदार तयारी सुरु केली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने पालिका आणि खासगी रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञांना प्रशिक्षण देणे सुरु केले आहे. आतापर्यंत मुंबईतील 300 बालरोगतज्ज्ञांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
तर दुसरीकडे पालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्थाही उभारण्यात आली आहे. पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी 10 ते 15 बेडसचे वॉर्ड आहेत.
मुलुंड जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 100, नेस्कोमध्ये 100 ते 200 तर दहिसर जम्बो कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी 100 बेडस् राखीव ठेवण्यात आले आहेत.