#पटियाला _लोकसभा_2019 : परनीत कौर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली – पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पत्नी आणि पटियाला लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार परनीत कौर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

पटियाला लोकसभा मतदार संघात यंदा परनीक कौर यांना आम आदमी पक्षाच्या उमेदवार निना मित्तल आणि अकाली दलाचे सुरजीत सिंह यांचे आव्हान असणार आहे.

दरम्यान, पटियाला लोकसभा मतदार संघात मागील 2014 च्या निवडणुकीत आपच्या धर्मवीर गांधी यांनी परनीत कौर यांचा 21 हजार मतांनी पराभव केला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.