पुणे -ऑटोमोटिव्हच्या उद्योगात आपली स्थिती मजबूत करण्यासाठी एएमजी कॉर्पोरेशनने आपला फ्लॅगशिप ब्रॅण्ड प्रीमियर प्लसचा लोगो नव्या रूपाने सर्वांन समोर आणला आहे. प्रिमिअर प्लस ची खासियत सस्पेन्शन व एनव्हीएच अँप्लिकेशन्स मधील रबर व मेटल-टू-रबर बोन्डेड कॉम्पोनन्ट ही आहे. आणि हे प्रोडक्ट्स 3 व्हीलर, पॅसेंजर कार आणि लाइट कमर्शियल व्हेइकल या सेगमेंट्स मध्ये वापरले जातात.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आकाश गुप्ता कार्यकारी संचालक सुमित गुप्ता म्हणाले की, आम्ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश केल्यामुळे नवीन ब्रॅंड ओळख आमच्यासाठी एक महत्वपूर्ण रणनीति असेल. कंपनी माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक्स वेअरहाऊसिंग, सिस्टीम, वितरण नेटवर्क आणि उत्पादनाच्या विकासामध्ये 30 कोटी रूपये गुंतवणूक करत आहे.