लंडन : इंग्लिश प्रीमियर लीगमधील खेळाडू व सहाय्यक कर्मचारी यांच्या नुकत्याच कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 16 जणांचा कोरोना अहवाल हा पाॅझिटिव्ह आला आहे.
जूनपासून फुटबॉलच्या विविध स्पर्धा खेऴविण्यास सुरूवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत एका आठवड्यात ( 9 ते 15 नोव्हेंबर) सापडलेल्या कोरोना बाधितांची ही आकडेवारी सर्वाधिक आहे.
इंग्लिश प्रीमियर लीगने म्हटले आहे की, 9 ते 15 नोव्हेंबर दरम्यान 1 हजार 207 खेळाडू आणि क्लब स्टाफची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 16 जण पाॅझिटिव्ह आढळले असून त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत परंतु ते सर्व दहा दिवस विलगीकरणात राहतील.