नवी दिल्ली –सहाव्या मोसमातील प्रीमियर बॅडमिंटन लीग (पीबीएल) करोनाच्या धोक्यामुळे पुढील वर्षांपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे ही स्पर्धा पुढील महिन्यात होणार होती.
दिल्ली, मुंबई व पुणे येथे स्पर्धेच्या तीनही फेऱ्या होणार होत्या. मात्र, करोनामुळे डिसेंबरमध्ये ही स्पर्धा आयोजित करणे शक्य नसल्याचे या स्पर्धेचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदा सहावे वर्ष असून गेली पाचही वर्षे ही स्पर्धा डिसेंबर व जानेवारी या कालावधीत होत होती.