प्रेम सिंह गोले यांनी घेतली सिक्कीमच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

सिक्कीम – सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा (एसकेएम) चे अध्यक्ष प्रेमसिंह तमांग उर्फ पीएस गोले यांनी सोमवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल गंगा प्रसाद यांनी प्रेम सिंह गोले यांना गोपनीयतेची शपथ दिली.

यावेळी एसकेएमच्या ११ आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. खरेतर गोले यांनी निवडणूक न लढवल्यामुळे ते सध्या राज्य विधानसभेचे सदस्य नाहीत. मात्र एसकेएमचे विधानमंडळ पक्ष नेते म्हणून त्यांची शनिवारी निवड करण्यात आली होती.

दरम्यान, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा ( एसकेएम )ने 32 सदस्य असलेल्या सिक्कीम विधानसभेत 17 जागांवर विजय मिळवत, स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे, तर ‘एसडीएफ’ला 15 जागा मिळाल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here