चुलबुली गर्ल प्रिती झिंटाने आज आपल्या फॅन्सना एक भन्नाट सल्ला दिला आहे. अन्य कोणत्याही गोष्टींपेक्षा आनंदी राहण्याचा पर्याय स्वीकारा, असे तिने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे. आपला च्युस्डे थॉट म्हणून तिने ही पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
Sunshine after the rain is pure happiness 🤩 #weekendvibes #sunshine #ting 📸 @ashguptaslife
“सकाळी सकाळी मनात आलेला एक सकारात्मक विचार आपल्या संपूर्ण दिवसाला बदलून टाकू शकतो.’ असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. इतर अनेक गोष्टींपेक्षा आनंदी राहण्याचा पर्याय निवडणेच फायद्याचे आहे. दररोज स्वतःला प्रेरणा देण्यासाठी आनंदी, उत्साही आणि सकारात्मक राहणेच फायद्याचे आहे, असेही तिने म्हटले आहे.
लॉकडाऊनच्या काळात प्रिती झिंटाने स्वतःला क्वॉरंटाइन करून घेतले होते. या काळात आपण काय काय केले, याचा अपडेट प्रितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना दिले आहे. यापूर्वी शिक्षक दिनाच्या दिवशी प्रितीने दिवंगत नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांच्याबद्दलची एक भावपूर्ण पोस्टही लिहिली होती. सरोज खान या अतिशय स्पष्ट टेकाकार होत्या, असे म्हणून प्रितीने सरोज खान यांचा एक छानसा फोटोही शेअर केला होता.
View this post on Instagram
A smile is a frown upside down ❤️🌈😍⭐️ 📸 @ashguptaslife #smileseries #ting