मुंबई – प्रीती झिंटा नेहमी हसत असते म्हणूनच ती सर्व चिंता आणि तणावापासून मुक्त असते. सध्या कोविड-19 च्या साथीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी ही लाफ्टर थेरपी स्वीकारावे आणि तणावापासून मुक्त व्हावे असे तिने आपल्या फॅन्सना सुचवले आहे.
इंस्टाग्राम वर तिने स्वतःचा खळखळून हसवणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये प्रीती झिंटाला स्विमिंग पूल च्या शेजारी उभी आहे आणि मनमुरादपणे हसते आहे असे दिसते आहे.
लाफ्टर थेरपी ही नेहमीच सर्वोत्तम थेरपी राहिलेली आहे विशेषतः तणावाच्या काळामध्ये किंवा लॉक डाऊन मुळे घरातच अडकून पडलेले असाल तर आपल्या संवेदना जाग्या ठेवण्यासाठी ही हास्य थेरपी सर्वोत्तम आहे असे तिने म्हटले आहे.
या इंस्टाग्राम पोस्ट बरोबर तिने विकेंड व्हाईब असे काही हॅशटॅग उपक्रम सुरू केले आहेत त्याला आतापर्यंत 88,000 फॅन्सनी लाईक केले असून आपले फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत.