गर्भवती महिलांनी दिवाळीत अशी घ्यावी काळजी

दिवाळी, ज्याला दिव्यांचा सण म्हणूनही ओळखले जाते हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीच्या वेळी वायू आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते आणि या प्रदुषणामुळे मुले, प्रौढ व्यक्ती आणि गर्भवती महिलांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. दिवाळी साजरी करताना गर्भवती महिलांनी विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे.

दिवाळीत फटाक्‍यांमुळे होणाऱ्या प्रदुषणाचा त्रास हा गर्भवती महिलांना होत असून त्यामुळे श्‍वसनासंबंधी विकारही जडत असल्याने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही काय खाताय याकडे विशेष लक्ष द्या. फराळ तयार करण्याची लगबग सुरुच असते.

पण गर्भवती महिलांनी स्वतःच्या आहारावर अधिक लक्ष घालणे गरजेचे आहे. जेवणाच्या वेळा पाळा. तेलकट, तिखट, जंक फुड, गोड पदार्थांमुळे अपचनासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. सणासुदीला बाहेर जाताना सोबत नेहमीच पाण्याची बाटली, ताजी फळे, सुकामेवा बाळगावा. शरीरातील पाण्याची पातळीचा समतोल राखणे आवश्‍यक आहे. त्यामुळे शरीरातील पाण्याची मात्रा कमी होणार नाही याकडे लक्ष द्या.

मोठा अवाज तसेच गर्दीचा परिसर टाळा. गर्भवती महिलांसाठी मोठा आवाज त्रासदायक असू शकतो. म्हणूनच, अशा ठिकाणी जाणे टाळले पाहिजे जिथे ध्वनी प्रदूषण जास्त प्रमाणात आहे. फटाक्‍यांच्या मोठ्या प्रमाणात आतषबाजी होण्याची अपेक्षा असल्याने या धुल्किणांचे प्रमाण वाढून त्याचा गर्भवती महिला महिलांना मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे.

फटाकाच्या धूराला नाही म्हणा. दिवाळीमध्ये फटाक्‍यांमधुन निघणाऱ्या धुरापासून वाचण्यासाठी चेहरा झाकून घ्या. शक्‍यतो अशा परिसरात जाणे टाळा. जास्त धूर व प्रदूषण तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. गर्भधारणेच्या प्रारंभीच्या काळात आपल्या जन्मास श्‍वसनाच्या समस्येचा त्रास होण्याचा धोका जास्त असू शकतो. हे असे आहे कारण फटाक्‍यांच्या धुक्‍यात असलेले कार्बन डाय ऑक्‍साईड आणि नायट्रस ऑक्‍साईड गर्भवती महिलांसाठी त्रासदायक असू शकते. सुती कपडे वापरा.

टेरीलीन, पॉलिस्टर, नायलॉन आदी कपडे न घातला सुती कपड्यांचा वापर करा. कारण फटाक्‍याची एखादी ठिणगी जरी त्यावर पडली तरी त्यामुळे आपल्याला हानी होऊ शकते. अपघातापासून स्वतःचे संरक्षण करा. तसेच गर्भवती महिलांनी घरी दिवे लावताना खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. त्यामुळे भाजण्याची शक्‍यता असते. घरी प्रथमोपचार पेटी आहे की नाही याची खात्री करून घ्या. स्वतःच्या मनाने कोणतीही औषधे घेऊ नका.

– डॉ माधुरी बुरांडे-लाहा

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)