मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘क्रिती सेनन’च्या आगामी ‘मिमि’चे शुटिंग राजस्थानमध्ये सुरू आहे. हा एक महिलाप्रधान चित्रपट आहे. हा चित्रपट म्हणजे आपल्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरू शकतो, असे क्रिती मानते आहे. या सिनेमामध्ये क्रितीला मध्यवर्ती रोल आहे अणि सिनेमाची कथा तिच्याच अवतीभोवती फिरत राहते.
पण, आता या साऱ्यामध्ये तिच्या गरोदरपणाचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यामुळे कलाविश्वात क्रितीच्या गरोदरपणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. मुख्य म्हणजे क्रितीच्या खासगी आयुष्याविषयी फार काही माहिती सर्वांसमोर उघड झालेली नाही. शिवाय गेल्या काही काळामध्ये तिच्या लग्नाविषयीसुद्धा चर्चा रंगू लागल्या होत्या.
Exclusive- @kritisanon from the sets of Mimi !
RT if you can’t wait to watch her play yet another fabulous role onscreen. ?#Mimi #KritiSanon pic.twitter.com/1tmshujj3U
— Kriti Sαnon’s caƒє (@KritiSanonCafe) February 18, 2020
दरम्यान, क्रितीच्या या फोटोमध्ये ती गरोदर असल्याचं दिसत आहे. सलवार, कुर्ता, आणि स्वेटर घालून ती शांतपणे एका ठिकाणी बसली आहे. मुख्य म्हणजे तिचं हे रुप अनेक प्रश्न उपस्थित करणारं असलं तरीही त्याचा तिच्या खऱ्या जीवनाशी थेट संबंध नाही. कारण, क्रितीन हे सारंकाही तिच्या आगामी ‘मिम’ चित्रपटासाठी केलं आहे. तसंच तिने या भूमिकेसाठी तिने तब्बल १५ किलो वजन वाढवलं आहे.
‘मिमि’च्या निमित्ताने क्रिती पुन्हा एकदा ‘लुका छिपी’चे डायरेक्टर लक्ष्मण उत्तेकर आणि सहकलाकार पंकज त्रिपाठी यांच्याबरोबर काम करते आहे.