पोळ्यासाठी मातीच्या बैलजोड्यांना पसंती

चऱ्होली – पिंपरी-चिंचवड शहरात शेतीचे प्रमाण कमी झाले आहे. परिसरात मोठ मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे शेतीक्षेत्र कमी झाले आहे. तसेच शेतीशी निगडित प्राण्यांचे प्रमाणही घटले आहे. तरीही काही शेतीकरी मात्र अजूनही उर्वरित क्षेत्रात पारंपरिक शेती व्यवसाय करत असून, शेतीशी निगडित असलेले सणोत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करत आहेत.

शेतीमध्ये बैलांच्या वापराऐवजी यंत्राचा वापर होत असल्याने भाद्रपदी बैलपोळा सणाला मातीच्या बैलजोडी घेण्याला शेतकऱ्यांनी पसंती देत आहेत. मातीच्या बैलांच्या एका जोडीला शंभर रुपयांपासून ते दोन अडीच हजारांपर्यंत किंमत मिळत आहे. परंतु करोनामुळे बैलजोडीची मागणी घटली असल्याचे विक्रेत्याने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.