बाजारातील तयारपेक्षा घरच्या मोदकाला पसंती

पुणे – गणरायाचा आवडता पदार्थ असलेले मोदक मिठाईच्या दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. काहींनी मिठाईच्या तर अनेक महिलांनी घरीच गुळ-खोबऱ्याचे मिश्रण असलेले व उकडीचे मोदक बनवण्यास पसंती दर्शवली. त्यामुळे आयत्यापेक्षा घरी तयार केलेल्या मोदकाला पसंती दिसत होती.

गणपती बाप्पाला 21 प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य पहिल्या दिवशी दाखविला जातो. 21 भाज्या गोळा करणे प्रत्येक व्यक्तीला शक्‍य होत नाही. त्यामुळे 21 भाज्यांचे मिश्रण करून ते विक्रीस ठेवण्यात आले होते. या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला. तर दुर्लक्षित झालेल्या पत्रावळींनाही सुगीचे दिवस आले. घटस्थापना करण्यासाठी तसेच नैवेद्य दाखविण्यासाठी पत्रावळीचा वापर केला जात असल्याने पत्रावळीची मागणी वाढली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.