सोमेश्वरनगर परिसरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परीसरात गेली दोन दिवस सतत मुसळधार पाऊस पडत असून, या पावसामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

चौधरवाडी, सोमेश्वर मंदिर, करंजे, मुरूम, वाणेवाडी, निंबुत, खंडोबाची वाडी, वाघळ वाडी, करंजेपूल वाकी, चोपडज, होळ, वडगांव या परीसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सलग दोन दिवस झलेल्या सततच्या पाऊसाने ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी सखोल भागात पाणी साचले आहे.

सोमेश्वरनगरच्या काही भागातील तरकारी पिकांचे या पावसाने  मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे लागवड सऱ्यांमध्ये पाणी सठले आहे. परिसरातील बाजरी पीक जवळपास सर्व शेतकर्यांची मळणी व काढणी झल्यामुळे बाजरी हाताशी लागल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी, काही शेतकऱ्यांना झलेल्या पावसाने शेतातील बाजरी पीक सोडून द्यावे लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

चांगला पाऊस झाल्याने उसाबरोबरच इतर पिकांना याचा फायदा होणार असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.  हवामान खात्याने दिलेल्याअंदाजानुसार गेले दोन दिवस सततचा पाऊस सर्वत्र पडत आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)