प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती नोंदणीकडे “पाठ’

केवळ 1 लाख 33 हजार 313 विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी

पुणे – धार्मिक अल्पसंख्याक प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी आतापर्यंत केवळ 1 लाख 33 हजार 313 विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी केली. मात्र, ही संख्या पाहता योजनेस पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, शाळास्तरावर 60 टक्‍के अर्ज पडताळणीसाठी प्रलंबित आहेत.

इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळतो. यासाठी केंद्र शासनाच्या “एनएसपी’ पोर्टलवर अर्ज नोंदविण्याची सुविधा आहे. राज्यात 1 लाख 8 हजार शाळा आहेत. यातील काही शाळांना वारंवार सूचना देवूनही त्यांनी योजनेसाठी अद्याप नोंदणी केलेली नाही.

या शिष्यवृत्तीसाठी मुस्लीम, बौद्ध, जैन, ख्रिश्‍चन, शीख, पारसी या धर्मियांसाठी 2 लाख 85 हजार 451 एवढा विद्यार्थ्यांचा कोटा आहे. अर्जासाठी 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत दिली आहे. नूतनीकरणासाठी 6 लाख 98 हजार 711 विद्यार्थ्यांच्या अर्जांचे टार्गेट होते.

प्रत्यक्षात 3 लाख 92 हजार 242च नोंदणी झाली. नवीन अर्जाबरोबरच नूतनीकरणाच्या अर्जांचीही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्‍यक आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.