Maha Kumbh Mela Tent City Fire: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमध्ये काल बुधवारी (29) चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्घटनेत 40हून जास्त जणांचा आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी महाकुंभमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे.
महाकुंभाच्या सेक्टर 22 मध्ये ही घटना घडली असून, अचानक आग लागली आणि भाविक जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावू लागले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत अनेक पंडाल जळाले आहेत.
ज्या ठिकाणी आग लागली त्याठिकाणी सार्वजनिक व्यवस्था नव्हती त्यामुळे जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, आग कशामुळे लागली? अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कुंभ मै फिर एक और हादसा
फिर से भीषण आग : झूसी छतनाग घाट नागेश्वर सेक्टर 22 के पास महाकुंभ मेले में लगी भीषण आग कई टेंट जलकर हुए राख pic.twitter.com/HAHEDqCJst
— pandit Akash Shankdhar (@AkashShankdhar) January 30, 2025
दरम्यान, 19 जानेवारीलाही आग लागली होती, 180 झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. महाकुंभाच्या जत्रा परिसरात 19 जानेवारी रोजी दुपारी 4.30 च्या सुमारास आग लागली होती. शास्त्री पुलाजवळ सेक्टर 19 येथील गीता प्रेसच्या कॅम्पमध्ये आग लागली. आगीत गीता प्रेसच्या 180 कॉटेज जळून खाक झाल्या. होत्या गीता प्रेसच्या किचनमध्ये छोट्या सिलेंडरमधून चहा बनवत असताना गॅस गळतीमुळे ही आग लागल्याचे महाकुंभ प्रशासनाकडून सांगण्यात आले. आगीमुळे किचनमध्ये ठेवलेल्या दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.