“माझा प्रणितदादा गेला…” – ‘अरारा… खतरनाक…’ गाण्याचे गीतकार प्रणित कुलकर्णी यांच्या निधनानंतर प्रवीण तरडेंची भावुक पोस्ट

मुंबई – मुळशी पॅटर्न, देऊळबंद चित्रपटाचे गीतकार आणि प्रसिद्ध लेखक- दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन  झाले.  आज (17 मे 2021) पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 50 वर्षांचे होते. प्रणित कुलकर्णी यांच्या निधनाच्या वृत्तानंतर प्रवीण तरडेंनी ही पोस्टही केली.

प्रवीण तरडेंची भावूक पोस्ट

माझा प्रणित दादा गेला .. सरस्वती प्रसन्न असलेला शब्दप्रभु हरपला ..

गीतकार ,लेखक ,दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी बद्दल लिहायला लागलो तर दिवस पुरायचा नाही .. नंतर सविस्तर लिहिलच ..

देवूळबंद ला माझ्या सोबत लेखन दिग्दर्शन आणि देवूळबंद , मुळशी पॅटर्न , सरसेनापती हंबीरराव चा गीतकार … अ रा रा खतरनाक , उन उन वठातून , आभाळा आभाळा , गुरूचरीत्राचे कर पारायण , हंबीर तु खंबीर तु अशी एका पेक्षा एक गाणी लिहून प्रणीतदादा गेला .. कायमचा..

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.