प्रवीण तरडे म्हणाले… ‘आय हेट यू सुशांत’

'प्रविण तरडे' यांची फेसबुक पोस्ट व्हायरल

मुंबई – अल्पावधीतच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अजोड कलागुणांच्या जोरावर एक वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेता ‘सुशांत सिंह राजपूत’ने आपला जीवनप्रवास थांबवला. मुंबईतील आपल्या निवासस्थानी त्याने गळफास घेत आत्महत्या केली. सुशांतची ही अकाली एक्झिट सर्वांच्याच जीवाला घोर लावणारी ठरली असून सुशांत आपल्यातून निघून गेला आहे हे सत्य पचवणं जड जातंय.

दरम्यान, सुशांतच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीतील  दिग्दर्शक-अभिनेते ‘प्रविण तरडे’ यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत सुशांतला आदरांजली अर्पण केली आहे.

प्रविण तरडे म्हंटले की,” परमेश्वरा हे काय चाललंय रे.. असं का ? या सोबत सुशांतसिंह राजपूतचा फोटो शेअर केला आहे. तर ट्विटमध्ये म्हटले आहे की, हे दुःख मोठं आहे .. आत्महत्ये पासून सुटके साठी तु छिछोरे दिलास मग आज तूच असा का गेलास ..? I hate you Sushant bhai“.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.