Praveen Kumar Left BSP। देशात आता लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना आखत आहेत. दरम्यान, निवडणुकांपूर्वी तेलंगणात बहुजन समाज पक्षाला मोठा धक्का. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण कुमार यांनी मायावतींची साथ सोडली आहे. भाजप बीआरएससोबतची युती संपवण्यासाठी बसपवर दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला.
एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, बसपा सोडल्याच्या काही तासांनंतर प्रवीण कुमार हे नागरकुर्नूल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. माजी आयपीएस अधिकारी प्रवीण कुमार एक-दोन दिवसांत त्यांच्या समर्थकांसोबत बैठक घेऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.
याविषयी बोलताना “मी नागरकुर्नूलमधून निवडणूक लढवण्यास तयार आहे, मग तो अपक्ष असो किंवा समविचारी पक्षाकडून” असे प्रवीण कुमार यांनी आपल्या निकटवर्तीयांना सांगितले असल्याचे म्हटले आहे.
या संकेतांचा अर्थ काय आहे ? Praveen Kumar Left BSP।
प्रवीण कुमार यांनी त्यांच्या समर्थकांद्वारे दिलेल्या संकेतांवरून असे दिसते की ते अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवू शकतात. के.चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती (BRS) त्यांना पाठिंबा देऊ शकते.
बीएसपीच्या माजी राज्य प्रमुखांनी आपल्या समर्थकांना, बीआरएससोबतचा निवडणूक करार रद्द करण्याची घोषणा करण्यासाठी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून दबाव होता” अशी माहिती दिली, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले की, “मी BRS सोबतच्या खुल्या युतीतून कसा बाहेर पडू शकतो? माझ्या विश्वासार्हतेचे काय होईल?”
प्रवीण कुमार भाजपविरोधात लढा सुरूच ठेवणार Praveen Kumar Left BSP।
माजी आयपीएस अधिकाऱ्याने भाजपच्या सांप्रदायिक आणि फॅसिस्ट धोरणांविरुद्ध सर्व शक्तीनिशी लढा देईन आणि बीआरएस नेतृत्वाशी सौहार्दपूर्ण संबंध कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केल्याचे मानले जाते. वर्तमापत्राच्या वृत्तानुसार, लोकसभा निवडणूक लढवणे ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. “युती तोडण्यासाठी हायकमांडकडून दबाव होता. मला ते मान्य न झाल्याने पक्षाचा आणि पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.” असे प्रवीण कुमार यांनी म्हटले आहे.