प्रविण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; मात्र पुण्याच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम

मुंबई – संभाजी ब्रिगेडचे नेते प्रविण गायकवाड यांनी आज काँग्रेस नेते मलिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत मुंबईतील टिळक भवनात काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र अजूनही पुण्याच्या उमेदवारीबाबत काँग्रेसकडूनही घोषणा करण्यात आलेली नाही, पण पुण्याच्या उमेदवार आज संध्याकाळपर्यंत जाहीर करणार असल्याची माहिती मलिकार्जुन खर्गे यांनी यावेळी दिली. तसेच रावेर मतदार संघातून उल्हास पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी दिल्याचे जाहीर केले.

काँग्रेसने जास्तीत जास्त जागा जिंकण्याची तयारी केली आहे. तसेच राहुल गांधी प्रचारासाठी मुंबईत येणार असल्याचे देखील खर्गे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, प्रविण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला असला, तरी त्यांना पुण्याची उमेदवारी मिळणार का हा सर्वात उत्सुकतेचा प्रश्न आहे. प्रविण गायकवाड यांचे गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसकडून पुण्याची लोकसभा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली, तरीही अजून काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेला नाही.

दरम्यान भाजपने पुण्यातून गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार हे पाहणं औत्स्तुक्याचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.