पुणे – पुण्यातल्या एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या धोरणांवर टीका करताना प्रविण दरेकर यांनी आक्षेपाचे भाषेचा वापर वाद निर्माण झाला. मुंबई येथे महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचारातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका केली आहे.
ते पुढे म्हणाले,’गरिबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,’ असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं होतं. येत्या 16 सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची राज्यात जोरदार चर्चा आहे. यावरून त्यांनी हा टोला लागवल्याचे म्हंटले जात आहे. त्यांचा या टीकेवर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दरेकर यांना स्पष्ट इशारा दिला आहे.
रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवर व्हिडियो शेअर ठरत म्हंटले आहे की,’दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा आम्ही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा’ असा इशारा त्यांनी दिला आहे.
प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा.@mipravindarekar pic.twitter.com/T4CDp5jvFy
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 13, 2021