मुंबई – मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरेने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेकांना घायाळ केले आहे. प्रार्थना अनेकदा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती इनस्टाग्रामवर शेअर करते. मात्र तिने शेअर केलेल्या एका फोटोमुळे तिला ट्रोल करण्यात आले आहे. मात्र प्रार्थनाच्या काही चाहत्यांनी तिला पाठिंबा देखील दिला आहे.
प्रार्थना बेहरेने स्विमिंग पूलजवळील निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या मोनॉकिनीमधील फोटो शेअर केले आहे. यात ती हॉट लुकमध्ये दिसत आहे. यावरून नेटकऱ्यांनी तिच्या टीका केली आहे. ‘ताई तुमच्या फोटोंमधून चुकीचा संदेश जातोय. मराठी संस्कृतीला हे शोभत नाही’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘सुंदरतेची व्याख्या फक्त नग्न फोटो असा ट्रेंड का होतोय?’, ‘मराठी संस्कृतीत शोभत नाही ‘अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. काहींनी तिची तुलना उर्फी जावेदसोबत केली आहे.
View this post on Instagram
मात्र प्रार्थनाचे चाहते तिच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. ‘स्विमिंग कॉस्च्युम घालून स्विमिंग करणार नाही तर काय साडी घालून करणार का?’, संस्कृती जपण्याचा काय तिने एकटीनेच ठेका घेतला का?’ असा सवाल ट्रोल करणाऱ्यांना विचारला आहे. दुसरीकडे, प्रार्थनाचे हे फोटो मराठी कलाकारांच्या पसंतीस पडले आहेत. पूजा सावंत, श्रेयस तळपदे यांनी तिच्या फोटोला लाइक केल आहे. तर श्रेयसने ‘फ्लावर समझे क्या, फायर है मॅडम’ अशी कमेन्टही केली आहे.