पुणे – जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेत आयोजित स्वाक्षरी कार्यक्रमात तयार केलेल्या फलकावर विविध थोर कर्तृत्ववान स्त्रियांचे फोटो छापले होते. त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या फोटोऐवजी त्यांची भूमिका साकारणाऱ्या एका चित्रपटातील अभिनेत्रीचा फोटो छापला. त्यावरून सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके नाराजी व्यक्त केली.
यावेळी अन्य सदस्यांनीही उभे राहून या प्रकाराचा निषेध केला. त्यावर जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिलगिरी व्यक्त करत, यापुढे असे प्रकार घडू नये अशी प्रशासनाला तंबीही दिली.
मात्र, हा प्रकार प्रशासनाने केला आहे, तर त्यांनी दिलगीरी व्यक्त केली पाहिजे असा पवित्रा सदस्यांनी घेतला.
यावेळी शरद बुट्टेपाटील, शलाका कोंडे, तुलशी भोर, राणी शेळके, सुजाता पवार, जयश्री पोकळे, जयश्री भूमकर आदी निषेधाला उभे राहिले.