प्रशांत किशोरांच्या हकालपट्टीनंतरच्या ट्विटने संभ्रम! ‘शुभेच्छा’ की ‘इशारा’?

पाटणा – निवडणूक चाणक्य प्रशांत किशोर यांची नुकतीच जनता दलातून (यु) हकालपट्टी करण्यात आली आहे. २०१८मध्ये जनता दलातून आपल्या राजकीय कारकीर्दीस सुरुवात केलेल्या प्रशांत किशोर यांनी अल्पावधीतच पक्षामध्ये आपलं विशेष स्थान निर्माण केलं होतं. पक्षाने त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपद बहाल केल्यानं नितीश कुमारांचे उत्तराधिकारी म्हणून प्रशांत किशोर यांच्याकडं पाहिलं जात होत मात्र गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार व प्रशांत किशोर यांच्यातील संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता.

अशातच आता जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांच्या हकालपट्टीची अधिकृत घोषणा केल्यानंतर किशोर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून याबाबत प्रतिक्रिया देताना किशोर यांनी, ‘धन्यवाद नितीश कुमार! बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची पुन्हा एकदा तुम्हालाच मिळवी अशी सदिच्छा. देव तुमचं भलं करो??’ असं ट्विट केलं आहे.

दरम्यान, निवडणूक चाणक्य अशी ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांचे नितीश कुमारांच्या बाबतीतले हे ट्विट शुभेच्छा म्हणावे की आगामी बिहार विधानसभा निवडणुकांसाठी दिलेला इशारा समजावं असा संभ्रम निर्माण झाला आहे.

तत्पूर्वी, राष्ट्रीय जनता दलाने (यु) संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन दिलं असताना देखील पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी सातत्याने सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात भूमिका मांडल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असली तरी यामागची नेमकी कारणं स्पष्ट झाली नाहीत.

सध्या प्रशांत किशोर हे दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षासाठी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करत असून ते यानंतर बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या विरोधकांसोबत काम करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे.

Thank you @NitishKumar. My best wishes to you to retain the chair of Chief Minister of Bihar. God bless you.??

— Prashant Kishor (@PrashantKishor) January 29, 2020

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.