फसवणुकीच्या आरोपाखाली प्रशांत नारायणला अटक

“मर्डर 2′ आणि “पीएम नरेंद्र मोदी’ या दोन्ही सिनेमांमध्ये महत्वाची भूमिका साकारणारा अभिनेता प्रशांत नारायण आणि त्याच्या पत्नीला फसवणुकीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. प्रशांत मूळचा केरळचा रहिवासी आहे. तर त्याची पत्नी शीना मूळची पश्‍चिम बंगालमधील आहे. या दोघांनाही केरळ पोलिसांच्या टीमने मुंबईमध्ये अटक केली आहे.

एका मल्याळम निर्माता थॉमस पेनिकरने प्रशांत नारायणच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. शीनाच्या वडिलांनी मुंबईत एक कंपनी सुरू केली असून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास संचालक बनवण्याचा प्रस्ताव प्रशांतने पेनिकरला दिला होता. पेनिकरनी या कंपनीमध्ये 1.20 कोटी रुपये गुंतवले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

प्रशांत नारायण त्याच्या पत्नीचा ठावठिकाणा शोधत केरळ पोलिसांचे पथक मुंबईला पोहोचले आणि त्यांनी प्रशांत नारायणला बेड्या ठोकल्या. त्या दोघांना आता केरळला नेले गेले आहे. कोर्टाने या दोघांनाही 20 सप्टेंबरपर्यंत कस्टडी सुनावली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×