prashant kishore on election। देशातील लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजपला आता केंद्रात त्यांच्या मित्रपक्षांची मदत घेऊन सत्ता स्थापन करावी लागणार आहे. या सर्व घडामोडीत निवडणुकीच्या अगोदर राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर यांनी काही अंदाज वर्तवला होता. त्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असे म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. यावरच आता त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
निकालानंतर प्रशांत किशोर यांनी मान्य केले कि त्यांच्या आकलनात काही राहून गेले. त्यांनी दावा केला होता की यावेळी भाजप आणि एनडीए 2019 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करतील किंवा 303 पेक्षा जास्त जागा मिळवतील परंतु या निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत.
प्रशांत किशोर यांनी 7 व्या टप्प्याच्या मतदानापूर्वी भविष्यवाणी केली होती. त्यात त्यांनी भाजपने 5 वर्षांपूर्वी ज्या जागा जिंकल्या होत्या त्याच नाही तर पूर्व आणि दक्षिण भारतात भाजप चांगली कामगिरी करेल असे म्हटले होते. परंतु जेव्हा निकाल आले तेव्हा प्रशांत किशोर यांचे काही आकलन बरोबर सिद्ध झाले पण भाजप स्वबळावर केवळ 240 मतांचा आकडा गाठता आला.
माझ्या आकलनात काही कमतरता prashant kishore on election।
मात्र, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले की, माझ्या आकलनात काही कमतरता असू शकते. त्याचाच हा परिणाम आहे. म्हणजे मीच कुठे तरी कमी पडलो. प्रशांतने दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांमधील वाढीच्या आधारे त्यांचे मूल्यांकन केले होते, परंतु तसे झाले नाही. मात्र, 2019 मध्ये भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी 0.7 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे भाजपच्या २० टक्के जागा कमी झाल्या.
भाजपला रोखण्याचे लोकांचे उद्दिष्ट prashant kishore on election।
प्रशांत किशोर म्हणाले की, या निवडणुकीतील पहिला घटक म्हणजे विरोधकांची एकजूट, जी त्यांनी चांगलीच साधली. ते म्हणाले की, जे भाजपच्या विरोधात होते त्यांचा उद्देश भाजपला कोणत्याही प्रकारे रोखणे हेच होते. कुठेतरी भाजपवाले भाजपला 400 नक्कीच मिळतील असा विश्वास वाटत होता. यादरम्यान प्रशांत यांनी पीएम मोदींच्या वाराणसी लोकसभा सीटचे उदाहरण दिले. 2014 पासून त्यांचा स्वतःचा वाटा 2 ते 3 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्याचवेळी त्यांचे प्रतिस्पर्धी अजय राय यांना 41 टक्के मते मिळाली आहेत.