मुंबई – भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे’, असे अजब विधान केले आहे. भाजपच्या नेत्यांची शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव सुरूच असल्याचं यातून दिसून येत आहेत. सध्या प्रसाद लाड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये त्यांनी हे व्यक्तव्य केल्याचं दिसून येत आहे. मात्र, प्रसाद लाड यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली असून, एका नवीन वादाला तोंड फुटल्याचा दिसून येत आहे.
सध्या प्रसाद लाड यांच्या या व्यक्तव्याचा राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून निषेध नोंदवला आहे. अशातच आता प्रसाद लाड यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलताना प्रसाद लाड म्हणले की, “कालच माझं वक्तव्य मी सुधारल होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राष्ट्रवादी ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा मी निषेध करतो.
ज्या भावनेतून आम्ही कार्यक्रम केला स्वराज्य कोकण भूमी त्यामध्ये मी स्पष्टपणे म्हंटलं होतं. त्यानंतर मी माझी चुकही सुधारली होती. तुम्ही व्हिडिओमध्ये पहिलं तर लक्षात येईल. तरीदेखील माझ्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो’ असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीच्या ट्विटर हॅन्डलवरून प्रसाद लाड यांच्या व्हीडिओ शेअर करण्यात आला….
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या.@PrasadLadInd@BJP4Maharashtra pic.twitter.com/gU1P43QLFD
— NCP (@NCPspeaks) December 4, 2022
“भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असं विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या!’ असं ट्विट राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आलं आहे.