मुंबई- वेगळ्या आणि मिश्खील हसण्यासाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या लंडनच्या लंडनच्या दौऱ्यावर आहे. लंडनमधील एक व्हीडियो पोस्ट केला आहे. आगामी चित्रपट छु मंतरच्या शुटसाठी ती सध्या लंडनमध्ये आहे.
पोस्ट केेलेल्या व्हीडियोत ती मनमुराद थिरकताना दिसते आहे. यादरम्यान ती तिथले फोटो व अपडेट चाहत्यांना सोशल मीडियावर देते आहे. नुकताच तिने पहला नशा गाण्यावर थिरकतानाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
दरम्यान, या चित्रपटात प्रार्थना बरोबर रिंकू राजगुरु, सुव्रत जोशी, सायली संजीव सुद्धा झळकणार आहे. सध्या कोरोनाच्या परिस्थितीत सगळी काळजी घेत हे सगळे कलाकार शुट करताना दिसत आहे.