मुंबई – अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचे नाव आहे. अनेक चित्रपटात तिने काम केले आहे. तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने चाहत्यांच्या मनात आपले स्थान पक्के केले आहे. प्रार्थना सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. अनेक फोटो आणि व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. अनेकदा तिला तिच्या फोटोवरून ट्रोलही केले जाते. नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र यावेळी तिच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
प्रार्थनाने इनस्टाग्राम अकाऊंटवर तिचे पिवळ्या रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. अनेकांना तिचे हे फोटो पसंती पडले आहेत. तर काहींनी तिच्यावर टिकाही केली आहे. लोकांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक करत ‘एकदम कडक दिसते’, ‘खूपच सुंदर’ अशा कमेन्ट केल्या आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, प्रार्थनाने कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रार्थनाने रसिकांची मनं जिंकली आहेत. चित्रपटांसोबतच प्रार्थना टीव्ही सिरियल्समध्ये देखील झळकली आहे.