पवित्र रिश्ता आणि क्राईम पेट्रोलसारख्या नॅशनल टेलिव्हिजन मालिकांमधून देशभर फॅन फॉलोईंग असलेली आणि “कॉफी आणि बरंच काही,’ “मितवा’, जय महाराष्ट्र ढाबा भटींडा’ अशा विविध मराठी सिनेमांमधून लोकप्रियता मिळवलेल्या प्रार्थना बेहरेचा नवा सोज्वळ अंदाज तुम्हाला नक्कीच आवडेल.
View this post on Instagram
आपल्या अधिकृत फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवर प्रार्थनाने निळ्या रंगाच्या पैठणी साडीमधले फोटोज प्रसिद्ध केले असून, यामध्ये तिने सोज्वळ आणि मोहक दिसून येत आहे. अक्षय्य तृतीया या निमित्त तिने हा लुक केला आहे. सोबतच या फोटोमध्ये काठापदराची पैठणी, नेकलेस आणि मोकळे केस या लुकमध्ये ती देखणी दिसत आहे.
View this post on Instagram
तिचा फोटोशूटमधील अंदाज तिच्या फॉलोअर्सना चांगलाच आवडला आहे. आपल्या वेगळ्या शैलीतील हसण्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या फोटो शिवाय झी मराठी वाहिनीवर माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील भूमिकेमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.