पारगाव शिंगवे, – आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे श्री विठ्ठल रुक्माई व श्री महादेव मंदिर यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा हा कार्यक्रम गुरुवार (दि.५) व शुक्रवार (दि. ६) २०२४रोजी या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये आजित करण्यात येणार आहे. या निमित्ताने गावात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. अशी माहिती गावच्या सरपंच श्वेता ढोबळे यांनी दिली आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे गुरुवार (दि. ५) रोजी गावातून कलेश दारी महिलांची व मूर्तींची भव्य मिरवणूक यानंतर मूर्तीस अभिषेक,पूजा, होम आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहे. तसेच रात्री ह.भ.प. सागर महाराज बेलापूरकर यांचे कीर्तन होणार आहे व महाप्रसाद हा कार्यक्रम होणार आहे. तसेच शुक्रवार (दि.६) रोज मूर्तीस जल अभिषेक, महापूजा, तसेच विठ्ठल रुक्माई व महादेव शिवलिंग व नंदी मूर्ती स्थापना हा कार्यक्रम ह.भ.प. रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच कलशारोहण कार्यक्रम प्रसाद महाराज अमळनेर यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर महाआरती, महाप्रसाद व दुपारी ४ वाजता ह.भ.प. पुष्पकर महाराज गोसावी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे व शनिवार (दि.७) रोजी ह.भ.प. जयंत महाराज गोसावी यांचे हरिकीर्तन होणारे व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.