जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : प्रणोयचा लिन डॅनवर सनसनाटी विजय

बासेल – विश्‍वविजेतेपदावर पाच वेळा आपले नाव कोरणाऱ्या लिन डॅन याच्यावर भारताच्या एच.एस.प्रणोयने सनसनाटी विजय नोंदविला आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्‍यपद स्पर्धेत तिसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. त्याने हा सामना 21-11, 13-21, 21-7 असा जिंकला.

जिगरबाज खेळाडू म्हणून ख्याती असलेल्या प्रणोयने लिनचे कोणतेही दडपण घेतले नाही. लिनने आतापर्यंता पाच वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. तसेच दोन वेळा त्याने या स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले आहे. ऑलिंपिकमध्येही त्याने दोन वेळा सुवर्णपदक पटकाविले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एक तास चाललेल्या लढतीत प्रणोयने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्‍यांबरोबरच प्लेसिंगचाही सुरेख खेळ केला. पहिल्या गेममध्ये त्याने लिनच्या परतीच्या फटक्‍यांवर खणखणीत उत्तर दिले. ही गेम त्याने सहज घेतली. दुसऱ्या गेममध्ये प्रणोयकडून झालेल्या चुकांचा फायदा लिनला मिळाला. लिनने ड्रॉपशॉट्‌सबरोबरच कॉर्नरजवळ प्लेसिंग करीत प्रणोयला फारशी संधी दिली नाही. तरीही प्रणोयने त्याला चांगली झुंज दिली. ही गेम घेत लिनने सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली.

त्यामुळे तिसऱ्या गेमबाबत उत्कंठा निर्माण झाली. या गेममध्ये प्रणोयने स्मॅशिंगच्या आक्रमक फटक्‍यांचा बहारदार खेळ केला. त्याच्या आक्रमक खेळापुढे लिनचा बचाव निष्प्रभ ठरला. त्याच्याकडून झालेल्या चुकांचाही प्रणोयने फायदा घेतला आणि एक तास चाललेली ही लढत जिंकली.

महिलांच्या दुहेरीत भारताच्या अश्‍विनी पोनप्पा व एन.सिक्की रेड्डी यांना चीन तैपेईच्या चांग चिंग हुई व यांग चिंगलुईन यांच्याकडून पुढे चाल मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)