प्रजनेश गुन्नेश्‍वरनची कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानी झेप

नवी दिल्ली – भारतीय संघाचा स्टार टेनिसपटू प्रजनेश गुन्नेश्‍वरनने पुरुषांच्या टेनिस रॅंकिंगमध्ये 80व्या स्थानी झेप घेतली असून हे त्याचे आता पर्यंतचे सर्वोत्तम रॅकिंग आहे.

प्रजनेशने याच वर्षाच्या फेब्रुवारी महिण्यात क्रमवारीत पहिल्या 100 खेळाडूंमध्ये स्थान पटकावले होते. यावेळी त्याने आता पर्यंत आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावीत करत गत रॅंकिंगमध्ये 82वे स्थान पटकावले होते. मात्र, सोमवारी जाहीर झालेल्या क्रमवारीत त्याने दोन अंकानी झेप घेत 80व्या स्थानी झेप घेतली असून आता पर्यंतच्या भारतीय खेळाडूंमध्ये क्रमवारीत एवढ्या वरच्या स्थानी स्थानी पोहोचलेला सहावा खेळाडू ठरला आहे.

यावेळी -प्रजनेशला इंडियन वेल्समधील कामगिरीचा भरपुर प्रमाणाता फायदा झाला असून त्याने या स्पर्धेतील तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारताना क्रमवारीत त्याच्या पेक्षा वरच्या स्थानी असणाऱ्या खेळाडूंचा पराभव करत आगेकूच केली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.