अजय देवगनच्या “भुज’मध्ये झळकणार प्रनीता सुभाष

बॉलीवूडमधील सिंघम अर्थात अजय देवगण याच्या आगामी “भुज ः द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रनीता सुभाष झळकणार आहे. प्रनीताने अनेक सुपरहिट ठरलेल्या तमिळ आणि तेलुगू चित्रपटामध्ये काम केलेले आहे.

आयुष्मान खुरानाचा नुकताच प्रदर्शित झालेल्या “चन कित्थां’ या म्यूझिक व्हिडिओमध्येही प्रनीता झळकली होती. “भुज’मध्ये प्रनीता आणि अजय देवगणसह संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, राणा डग्गुबाती, परिणीती चोप्रा आदी स्टार कलाकार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक दुधैया यांनी केले असून हा चित्रपट पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात अजय देवगण हा आयएएफ विंग कमांडर विजय कार्णिक यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 1971मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धात विजय कार्णिक यांनी भुज एअरपोर्टचे इंचार्ज होते.

कार्णिक आणि त्यांच्या टीमने महिलांच्या मदतीने भुजमधील नष्ट झालेली धावपट्‌टी पुन्हा तयार केली होती. याला भारताचे “पर्ल हॉर्बर मुव्हमेंट’ म्हणून ओळखले जाते. ही एअरस्ट्रिप पाकिस्तानने बॉम्ब हल्ला करून नष्ट केली होती. कार्णिक यांनी जवळच्या गावातील 300 महिलांना मदतीसाठी विनंती केली होती. या महिलांच्या मदतीने धावपट्‌टीचे काम पूर्ण झाल्यामुळे भारतीय जवानांना सुरक्षितपणे लॅंडिंग करता आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.