उमेदवार संग्राम जगताप यांचा नागरिकांसमवेत प्राणायाम

नगर: लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना राष्ट्रवादी- कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांचीही प्रचाराची धामधूम सकळी लवकर सुरु होते. त्यामुळे त्यांनी शहरातील सावेडी जॉगिंग ट्रॅक, गंगा उद्यानात जाऊन सकाळीच व्यायामासाठी आलेल्या मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. तसेच त्यांच्याबरोबर प्राणायाम केला.

गंगा उद्यानात गेल्याबरोबर तेथे फिरायला आलेल्या व व्यायाम करण्यास आलेल्या नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. तसेच तेथे योगासने व प्राणायाम करणाऱ्या नागरिकांसमवेतही आ. संग्राम जगताप यांनी काही काळ प्राणायम केले. प्रचारात व्यस्त असतांनाही आ. जगताप यांनी सर्वांमध्ये मिसळून प्राणायाम केला.

यावेळी आ. जगताप यांनी गंगा उद्यान व जॉगिंग ट्रॅकमधील नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, सर्व नागरिकांच्या आशीर्वादाने नगर शहराचा महापौर म्हणून दोन वेळेस जबाबदारी सांभाळली. नागरिकांनीच मला आमदार म्हणून निवडून देऊन प्रमोशनही केले. विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांनी दिलेले ऋण मी फेडत आहे. सावेडी उपनगरात भरपूर कामे मार्गी लागली आहे. आता खासदार म्हणूनही मोठे विकास कामे करुन नगरचा चेहरा-मोहरा बदलायचा आहे. यासाठी पुन्हा एकदा मला सर्व नगरकरांची बहुमोल साथीची गरज आहे. तुमच्या सर्वांचा हक्काचा माणूस म्हणून मला लोकसभेत जाण्याची संधी द्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.