प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री; तर दोन जणांना मिळणार उपमुख्यमंत्रीपद

पणजी – गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून थोड्याच वेळात औपचारिक घोषणा होणार आहे. तर गोव्याला दोन उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. उपमुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्र गोमांतक पार्टीच्या सुदिन ढवळीकर यांच्या नावाची चर्चा असून विजय सरदेसाईदेखील उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. हे सर्व आज रात्रीच शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

सोमवारी सांयकाळी मित्रपक्षांसोबत झालेल्या बैठकीत हा तोडगा काढण्यात आल्याची माहिती सूंत्राकडून मिळाली आहे. गेल्या 24 तासांपासून मुख्यमंत्रीपदाच्या नावाबाबत चर्चा सुरू होती. मात्र तोडगा निघत नसल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पणजीत दाखल झाले होते. भाजपाला पाठिंबा देणार मित्रपक्ष राजी होत नसल्याने हा पेच वाढला होता. तर दुसरीकडे काँग्रेसनेही सत्ता स्थापनाचा दावा केला होता. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला होता.

सुदीन ढवळीकर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे तर सरदेसाई हे गोवा फॉरवर्ड पार्टीचे नेते आहेत. प्रमोद सावंत हे गोवा विधानसभेचे सभापती आहेत. उत्तर गोव्यातल्या सॅनक्वलिम या विधानसभेच्या जागेवरून ते जिंकून आले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×