मनोहर पर्रीकर यांना अपेक्षित असणारे कार्य करू- प्रमोद सावंत

पणजी: मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांनी आज सकाळी गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना अपेक्षित असणारे कार्य आपण करू पण मनोहर पर्रीकर हे एक मोठे व्यक्तिमत्व होते त्यामुळे त्यांच्या एवढे काम नाही जमले तरी तळागाळातील लोकांच्या विकासासाठी काम करत राहू, असा विश्वास नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

बुधवारी विधानसभेत आपण बहुमत सिद्ध करणार असल्याचे प्रमोद सावंत यांनी सांगितले. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोवा सरकारचा उर्वरित ३ वर्षाचा काळ आपण घटक पक्षांना सोबत घेऊन पूर्ण करणार असल्याचा दृढ विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रमोद सावंत यांनी मुखमंत्री पदाची धुरा संभाळण्यापूर्वी मुख्यमंत्री कार्यलयात मनोहर पर्रीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली.

Leave A Reply

Your email address will not be published.