#लोकसभा2019 : प्रकाशराज यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

नवी दिल्ली – केंद्र सरकारविरोधात वक्‍तव्य करून राजकीय कारकीर्द सुरू करण्याचे संकेत देणारे दाक्षिणात्य अभिनेते प्रकाशराज यांनी निवडणूक आयोगाकडे कॉंग्रेसविरोधात तक्रार दाखल केली आहे. बंगळुरूतून अपक्ष निवडणूक लढवणारे प्रकाशराज यांनी फेक न्यूजप्रकरणी कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

प्रकाशराज कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या देण्यात आल्या होत्या. याविरोधात प्रकाशराज यांनी बंगळुरूतील कॉंग्रेसचे उमेदवार रिझवान अर्शद यांचे जवळचे समजले जाणारे मजहर यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

प्रकाशराज यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात प्रकाशराज यांनी म्हटले की, कार्यकर्त्यांसोबत वाद सुरू असताना कॉंग्रेसचे उमेदवार रिझवान यांच्याशी मी हात मिळवला. यानंतर हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याची फेक न्यूज पसरवण्यात आली. हा फोटो व्हॉट्‌सऍपवर शेअऱ करून प्रकाशराज यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे खोटे पसरवले गेले. त्यामुळे त्यांना मतदान करून आपले मत वाया घालवू नका असे सांगण्यात आले आणि हे काम मजहर अहमद यांनी केले असून ते स्वत:ला रिझवान यांचे पीए सांगतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.