प्रकाश राज यांचा लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल

अभिनेते प्रकाश राज यांनी काही दिवसांपूर्वीच आपण लोकसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचे जाहीर केले होते. यातच वृत्तवाहिनींच्या वृत्तानुसार प्रकाश राज यांनी आज आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी  बेंगळूरु (मध्य) लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी  प्रकाश राज यांनी लोकसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचे जाहीर केले होते. याच पार्श्वभूमीवर आज प्रकाश राज यांनी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. केजरीवाल आणि प्रकाश राज यांच्या भेटीनंतर लगेचच केजरीवालांनी ‘आप’ण प्रकाश राज यांना लोकसभा निवडणुकीसाठी पूर्णपणे पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here