नवी दिल्ली – कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका वादग्रस्त पोस्टवरून संतप्त जमावाने मंगळवारी रात्री कॉंग्रेस आमदाराच्या घरावरच हल्ला केला. आणि काही भागात जातीय हिंसाचार भडकला. संतप्त जमाव आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमक झाली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला तर अनेक पोलीस जखमी झाले आहेत.
#bangaloreriots is nothing but barbaric. ..I strongly condemn this Religious fanaticism .. the instigator and the goons who took law into their hands should be punished. We as a society can not accept this #JustAsking
— Prakash Raj (@prakashraaj) August 12, 2020
बंगळुरूमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारावर अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. “एक समाज म्हणून आपण अशा घटनांना प्रोत्साहन देणं टाळायला हवं. धर्माच्या नावाखाली त्यांनी पुन्हा एकदा गोंधळ घातला. या धर्मांधतेची मी निंदा करतो. हे असभ्य लोकांचं लक्षण आहे. ज्या गुंडांमुळे ही दंगल उसळली त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे…” अस ते म्हंटले आहे.