मुंबंई – मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती देत प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. घटनापीठाच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नसल्याने वर्ष 2020-21 साठी मराठा आरक्षण स्थगित करण्यात आलं आहे.
मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आल्याने राज्यातील मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी राज्य सरकारविरोधात निदर्शने देखील करण्यात येत आहेत. विरोधकांकडून राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबतीत गंभीर नसल्यानेच आरक्षणावर स्थगिती आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अशातच आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण प्रश्नाबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी, ‘गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा,अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल.’ असं आवाहन देखील केलं आहे.
व्हिडिओसोबत लिहिलेल्या संदेशात ते लिहतात, “महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरिब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा,अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल.”
महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरिब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा,अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल. pic.twitter.com/cPqRise2q7
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) September 13, 2020