कॉंग्रेसला 40 जागांची ऑफर कायम: प्रकाश आंबेडकर

वंचितांचे प्रश्न सत्तेवर बसल्याशिवाय सुटणार नाहीत

औरंगाबाद – आम्ही कॉंग्रेसला 40 जागांची ऑफर दिली होती आणि आम्ही जोपर्यंत 288 जागा जाहीर करत नाहीत तोपर्यंत ही ऑफर कायम असल्याचे समजावे आणि त्यांनी निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. कॉंग्रेस आम्हाला लोकसभेत बी टीम आणि विधानसभेत सोबत या असं म्हणतेय. हे नक्की काय आहे याचा खुलासाही कॉंग्रेसने करावा असेही आंबेडकर म्हणाले.

औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची उपस्थिती होती. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही एकमेकांना स्वीकारत नाही म्हणून वंचितांची सत्ता येत नाही. मात्र आता आपल्याला बदलायचं आहे. लहान-मोठे सगळ्यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करायची आहे. वंचितांचे प्रश्न सत्तेवर बसल्याशिवाय सुटणार नाहीत म्हणून आपण सत्तेत यायला हवे असे आंबेडकर म्हणाले.

कारगिलमध्ये घुसखोरी झाल्याचे तिथल्या गडरिया समाजाने पुढे आणले. गडरिया म्हणजे तिथले धनगर. त्यांनी मला प्रश्न विचारला की आपल्याच भूमीतून आपण अतिक्रमण करणाऱ्यांना हुसकावून लावले मग हा कसला विजय दिवस. मात्र, सध्या राष्ट्रभक्ती देखावा झाला असल्याचे आंबेडकर म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.