Prakash Ambedkar | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजिओप्लास्टी यशस्वी झाली आहे. अँजिओग्राफीमध्ये त्यांच्या हृदयाच्या धमनीत ब्लॉकेज असल्याचं आढळून आले होते. त्यानुसार त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे. नुकतेच प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडिओ शेअर करत आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.
प्रकाश आंबेडकर याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. रुग्णालयातून प्रकाश आंबेडकर यांना आज कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, ‘मी सध्या आयसीयूमध्ये आहे. अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी दोन्ही झालेले आहे. डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवले आहे.’
बाळासाहेब आंबेडकरांचा ICU मधून महाराष्ट्रातील जनतेला महत्वाचा संदेश. pic.twitter.com/2vDTtjaUzP
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) November 2, 2024
पुढे ते म्हणाले, ‘निवडणुकीला सुद्धा सुरुवात झाली आहे. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. ओबीसींसाठी सुद्धा महत्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार आहे. आपले आमदार निवडून आले, तर आरक्षणावरून हल्ला आपल्याला थांबवता येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करा,’ असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना गुरुवारी (31ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे.