प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर पटलवार; म्हणाले…

कोल्हापूर: धर्मनिरपेक्षमतांची वंचितमुळे विभागणी होत असल्याचा आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःकडे बघाव, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला. ते कोल्हापूरात बोलत होते. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही त्यांनी टीका केली आहे. या निवडणुकीत ईव्हीएम हॅकिंग होणार नाही असा दावा देखील त्यांनी केला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन यात्रेची सांगता सभा आज कोल्हापूरात होत आहे. या निमित्तानं कोल्हापूरात आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वंचितमुळे धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होत असल्याच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. त्यांनी स्वतःच दामन तपासून पाहाव. बेदाग असेल तरच टीका करण्याचा अधिकार असतो असा टोला लागवला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आमची झेप मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आली आहे. त्यामुळेच त्यांनी आम्ही विरोधी पक्ष असू म्हटलंय. पण आमची झेप सत्ता संपादन करण्यापर्यंत आहे आणि हे येणाऱ्या निवडणुकीत ते करून दाखवू, असा विश्वासही आंबडेकर यांनी यावेळी व्यक्त केला. ईव्हीएम हॅकिंगची आर्थिक बाजारपेठ आहे. विरोधी पक्ष नसेल तर त्यांची बाजार कोलमडणार आहे. त्यामुळे हॅकिंग इंडस्ट्रीच विधानसभा निवडणुकीत हॅकिंगच्या मानसिकतेत नाही. त्यांनी अशी भूमिका घेतल्यास आम्ही सत्तेवर आलोच असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

वंचित ही भाजपची बी टीम असल्याच्या आरोपावर विचारलं असता असे आरोप करणारे भाजपचे गुलाम आहेत. असा टोला ही त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला लागवला आहे. तसेच एमआयएमसाठी आमचे दरवाजे खुले असल्याचा पुनरुच्चार ही करायला आंबेडकर विसरले नाहीत. प्रकाश आंबेडकरांच्या तुम्हाला उपचारानंतर एमआयएम कोणती भूमिका घेते हे पहावे लागणार आहे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here