कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. तर मराठा संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात उद्या कोल्हापुरात मूक मोर्चाचे आयोजन कऱण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आधीच कोल्हापुरात दाखल झाले आहेत.
कोल्हापुरात निघणारा मोर्चा हा पहिला मराठा मोर्चा ठरणार आहे. उद्याच्या मराठा मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार आहेत. वंचित बहुजन आघाडीने ट्विट करुन, ही माहिती दिली आहे.
मराठा आराक्षणाच्या मुद्दावरून काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी आंबेडकरांनी संभाजीराजेंना पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आता प्रकाश आंबेडकर उद्या आंदोलनस्थळी येऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत.
उद्या दि. १६ जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत.@Prksh_Ambedkar @YuvrajSambhaji
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) June 15, 2021
दुसरीकडे संभाजी राजे यांच्या मोर्चाला भाजपने पाठिंबा दिला आहे. या मोर्चामुळे मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भातील आंदोलन पेटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत.