एटीपी टेनिस स्पर्धेत प्रज्ञेश गुणेश्‍वरनची आगेकूच

लॉस काबोस (मेक्‍सिको) – भारताच्या प्रज्ञेश गुणेश्‍वरनने एटीपी टेनिस स्पर्धेतील आगेकूच कायम राखली. त्याने जागतिक क्रमवारीत 67 व्या स्थानावर असलेल्या जॉन मिलमनचा 6-4, 1-6, 6-2 असा पराभव केला.

चुरशीने झालेल्या सामन्यात गुणेश्‍वरनने पहिल्या व तिसऱ्या सेटमध्ये पासिंग शॉटसचा बहरदार खेळ केला. पावणे दोन तास चाललेल्या या लढतीत त्याला दुसऱ्या सेटमध्ये सर्व्हिसवर नियंत्रण ठेवता आले नाही. मात्र, निर्णायक सेटमध्ये त्याने अचूक व बिनतोड सर्व्हिस केल्या.

दुहेरीत भारताच्या जीवन नेंदुचेझियन व पुरव राजा यांना पराभवाचा धक्का बसला. लुकास पॉली व ग्रिगोर बॅरेरी यांनी त्यांच्यावर 6-3, 6-3 असा सहज विजय मिळविला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.