‘Let the festive mode begin’म्हणत प्राजक्ताने शेअर केला दिवाळी लुक

मुंबई -बॉलिवूड अभिनेत्रींना आपण नेहमीच बोल्ड अंदाजात पाहिलंय, आता बॉलिवूड कलाकारांच्या तोडीस तोड अशा मराठी अभिनेत्री बोल्ड फोटोशूट करताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)


गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळीचे सोशल मीडियावर बोल्ड फोटोशूट पोस्ट करताना दिसत आहेत. नुकतंच प्राजक्ताच्या एका फोटोशूटने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.’छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताने आपल्या अभिनयाची मोहिनी दोन्हीकडे घातली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

अभिनेत्री प्राजक्ता हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)


सिनेमा असो किंवा पसर्नल लाईफ अगदी आगामी प्रोजेक्‍टबद्दलची माहिती ही ती आपल्या फॅन्ससह शेअर करते. आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. तिचे फॅन्सही तिच्या फोटोंना भरभरुन लाईक्‍स आणि कमेंट्‌सच्या माध्यमातून पसंती देत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने  दिवाळीनिमित्त सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहेत. गोल्डन रंगाची साडी आणि त्यावर लाल रंगाची ज्वेलरी यामुळे प्राजक्ताचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

Let the festive mode beginअशी कॅप्शन देत प्राजक्ताने आपलं हे खास फोटोशूट इन्स्टाग्रामवर पोस्ट केलंय. प्राजक्ताचा हा लूक तिच्या फॅन्सना आवडला आहे. ब्युटिफूल, फॅब्युलस अशा कमेंट्‌सच्या तिच्या फोटोवर आल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.