Prajkta Mali | अभिनेत्री प्राजक्ता माळीने मालिकांसह चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच तिचा ‘फुलवंती’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. आर्या आंबेकर हिच्या आवाजात हे गाणं संगीतबद्ध करण्यात आलं आहे. तसेच यातील प्राजक्ता माळीचा लुक देखील चर्चेत आले आहेत. या गाण्यातील तिचा लूक अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
पेशवाईत लोककला आणि लोककलावंत ह्यांना मोठा राजश्रय मिळत होता. ह्याच काळात ‘फुलवंती’ आपली कला सादर करण्यासाठी मुघल दरबारात हजर झाली. ‘फुलवंती’चे सौन्दर्य आणि आणि मनमोहक नृत्यकला ह्या शीर्षकगीतातून होत आहे. Prajkta Mali |
View this post on Instagram
उमेश जाधव ह्यांचे नृत्य दिग्दर्शन असलेल्या या गाण्यात प्राजक्ता माळीने ‘फुलवंती’च्या रूपातील शीर्षकगीताला चारचांद लावले आहेत.‘फुलवंती’..शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात आपल्यासमोर अवतरणार आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. Prajkta Mali |
कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. हा चित्रपट11 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. सध्या या गाण्यातील भव्य-दिव्य दिसणारा सेट आणि प्राजक्ताच्या सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
हेही वाचा:
तेजस्वी प्रकाश लवकरच करणार ‘लग्न’