Rupali Chakankar । Prajakta Mali : बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या प्रकरणावर बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतले होते. यानंतर प्राजक्ताने पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.
तसेच, महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे काम केले जात असल्याचे म्हणत सुरेश धस यांनी माफी मागावी, असे म्हटले होते. त्यानंतर चित्रपट, राजकीय क्षेत्रातील अनेकजण तिच्या समर्थनार्थ उतरले आहेत.
काल रविवारी तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. अश्यातच आता राज्याच्या महिला आयोगाकडून महत्वाची पाऊले उचलण्यात येत आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.
प्राजक्ता माळी यांचा अर्ज मुंबई पोलीस, बीड पोलीस सायबर पोलिसांना पाठवला आहे. यासंदर्भात पोलिसांनी आम्ही निर्देश दिले असल्याचे रुपाली चाकणकर म्हणाल्या. प्राजक्ता माळी हे निमित्त आहे पण सोशल मीडियामुळे अनेक गैरप्रकार घडतात. शनिवारी प्राजक्ता माळी यांची तक्रार आमच्या कडे आली. चारित्र्य हनन केले जात असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
भाजप आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीसंदर्भात वक्तव्य केलं होतं. त्यानंतर केलेल्या बातम्या बदनाम करणाऱ्या आहेत असं तक्रारीत म्हटलं आहे.संबंधित पोलीस यंत्रणांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे अश्लाघ्य कमेंट करणं बदनाम करणं नव्हे. यूट्यूब चॕनल निघालेयत. रिच वाढवायला तिथे वाट्टेल ते टाकले जात आहे.त्यांच्यावरसायबर थ्रू कारवाई केली जाईल, असे देखील रुपाली चाकणकर म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी प्राजक्ताच्या समर्थनार्थ केली पोस्ट, वाचा…
पंकजा मुंडे म्हणतात की, ‘शक्ती’ शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची. ‘दुर्दैवी घटना’ हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे.. भावना कुठे आहेत?
चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निघृण हत्या या थांबवणे शक्य आहे ना पण कायद्याने, नियमाने!! ते राहिले बाजूला नुसती चिखल फेक. दुर्दैवाने सॉफ्ट टार्गेट आहे स्त्री आणि तिचे सत्व. काल पाहवलं नाही, पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे? तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी” या आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.