प्राजक्‍ता-अंकुश अडकले विवाहबंधनात

पुणे – लॉकडाऊनच्या काळात सिनेमासृष्टीतील सर्व कामकाज ठप्प झाले होते. यानंतर ते पुन्हा हळूहळू रुळावर येत आहेत. त्यातच नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही जोडपे विवाहबंधनात अडकत आहे. विशेषतः मराठी तारे-तारकांबाबत असे चित्र दिसून येत आहे. 

नवीन वर्षात प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक, आशुतोष कुलकर्णी आणि अभिज्ञा भावे हे कलावंत लग्नबंधनात अडकले. त्यानंतर आता चाहत्यांची लाडकी अभिनेत्री प्राजक्‍ता परब विवाहबंधनात अडकली आहे. अंकुश मरोदे याला तिने आपला जीवनसाथी बनवले आहे. आपल्या या प्रेक्षणीय लग्नाचे फोटो तिने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून या फोटोना असंख्य लाईक्‍स आणि कमेंट्‌स मिळत आहेत.

अंकुश मरोदेसह 9 जानेवारी 2021रोजी प्राजक्ता विवाहबंधनात अडकली. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की,”माझ्या नवऱ्याची बायको’. केवळ लग्नाचेच नाही तर प्राजक्‍ताने आपल्या हळदी समारंभ आणि मेहंदी सेरेमनीचेही फोटोही शेअर केले आहेत.

प्राजक्‍ता परबने आजवर ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण, ललित या मालिकांमध्ये काम केले आहे. सोबतच “माझ्या मित्राची गर्लफ्रेंड’ या वेबसिरीजमध्येही तिने निर्णायक भूमिका साकारली होती. अंकुश मरोदे हा लेखक आणि दिग्दर्शक आहे.

दरम्यान, येत्या काळात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हेदेखील लवकरच विवाह करणार आहेत. सोबतच “नटरंग’फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीसुद्धा कुणाल बेनोडेकरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.